7 जुलैपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील 'या' तीन जलद एक्स्प्रेसच्या अंतिम स्थानकात महिनाभरासाठी बदल

7 जुलैपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील 'या' तीन जलद एक्स्प्रेसच्या अंतिम स्थानकात महिनाभरासाठी बदल

मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 10, 11, 12, 13 या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अभियांत्रिकी विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंगची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, आत्ता या कामामधील त्रुटी निदर्शनास आल्याने लोकल आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होत असून मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. आत्ता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील तेजस, जनशताब्दी आणि मंगळुरू- सीएसएमटी रेल्वेगाड्या 7 जुलैपर्यंत दादर स्थानकावरच स्थगित करण्यात येणार आहेत. तर, दुसरीकडे लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागत आहेत.

मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 10, 11, 12, 13 या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे दिनांक 07 जूलैपर्यंत म्हणजे पुढील महिनाभरासाठी काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.

या चार फलार्टाच्य विस्तारीकरणाच्या कामामुळे गार्ड क्रमांक (12134) मंगळुरू सीएसएमटी, गाड़ी क्रमांक (22120) मडगाव सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (12052) मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस या तिन्ही अतिजलद रेल्वेगाड्या दिनांक 07 जूलै 2024 पर्यंत त्यांचा मुंबई दिशेने होणारा प्रवास दादरलाच संपणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com