महत्वाची बातमी! 'या' दिवशी कोकण रेल्वे मार्गावर चार तासांचा मेगाब्लॉक

महत्वाची बातमी! 'या' दिवशी कोकण रेल्वे मार्गावर चार तासांचा मेगाब्लॉक

प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Published on

निस्सार शेख | रत्नागिरी : कोकणवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर 15 जून रोजी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. तरी प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महत्वाची बातमी! 'या' दिवशी कोकण रेल्वे मार्गावर चार तासांचा मेगाब्लॉक
शिवसेना आमचीच बोलणारे या जाहिरातीत...; अजित पवारांचे टीकास्त्र, शिंदेंना दिले खुले आव्हान

गुरुवार 15 जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून हा मेगाब्लॉक सुरू होणार आहे. मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या मडगाव ते कुमठा सेक्शनमधून धावणारी 06602 मंगळुरु सेंट्रल ते मडगाव जंक्शन विशेष गाडी कुमटा स्थानकापर्यंत धावेल. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कुमटा ते मडगाव स्थानकादरम्यान ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर गाडी क्रमांक 06601 मडगाव -मंगळुरु जंक्शन या गाडीचा प्रवास कुमट्यापासून सुरू होणार आहे. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com