वर्सोव्यात सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग; 4 जण जखमी

वर्सोव्यात सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग; 4 जण जखमी

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क | मुंबईच्या वर्सोवामध्ये सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जण जखमी झाले असून त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

वर्सोव्यात सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या घटनेत सिलिंडरचे अनेक स्फोट झाले आहेत.सदर गोदाम रहिवासी भागात असल्याने सिलिंडरचे अनेक स्फोट झाल्याने गरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत आतापर्यत 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच 14-15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे. तसेच आग लागण्या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com