महाराष्ट्र
भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून प्रेमीयुगुलाची आत्महत्या
नमित पाटील । पालघरमध्ये स्वतःला आणि आपल्या प्रेयसीला श्रद्धांजली देत असल्याचे स्टेट्स ठेवून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली.घरातून लग्नाला विरोध करतील या भीतीने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तलासरीमध्ये राहणारा आशिष दुमाडा आणि रेश्मा डीकर या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करण्याच्या विचारात होते. मात्र घरचे विवाहाला विरोध करतीत अशी भीती या प्रेमी युगलाला होती. या भीतीपोटीच दोघांनी भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक होत आहे. तसेच पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.