बापरे! 155 चा रिचार्ज पडला 1 लाखाला, काय घडलं नेमकं?

बापरे! 155 चा रिचार्ज पडला 1 लाखाला, काय घडलं नेमकं?

एक 80 वर्षाच्या वृद्धाला 155 रुपयाचा रिचार्ज एक लाखाला पडला.
Published by :
Team Lokshahi
Published on

रिद्धेश हातीम | मुंबई : सध्या देशात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असताना दिसत आहे. या ऑनलाइन फसवणूकीविरुद्ध लवकरच कायदा अजून कठोर कायदा केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील देण्यात आले आहे. तसेच मुंबई पोलिसांकडून देखील अनेकदा ऑनलाइन फसवणूक संदर्भात जनजागृती केली जाते. मात्र, तरी लोक या ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. अशीच एक घटना सांताक्रुज परिसरात घडली ज्यात एक 80 वर्षाच्या वृद्धाला 155 रुपयाचा रिचार्ज एक लाखाला पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुज येथील एक 80 वर्षीय वृद्ध यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये 155 चा रिचार्ज केला होता. मात्र तो रिचार्ज सक्सेसफुल न झाल्याचा त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी बँकेत माहिती काढल्यावर त्यांना समजले की त्यांच्या खात्यातून 155 रुपये हस्तांतरित झाले आहे.

त्यांनी दूरध्वनीवरून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला, त्याने आपण बँकेच्या सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगितले. कंपनी त्यांचे रुपये परत करत असल्याचे सांगून आरोपीने त्यांना रस्ट डेस्क नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून विविध व्यवहारांद्वारे एक लाख दोन हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले. दरम्यान फसवणूक झाल्याची समजतात वृद्धाने वाकोला पोलीस ठाण्यात या सर्व संदर्भात गुन्हा नोंदवला आहे. आता पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com