देवेंद्र फडणवीसांनी 75 टक्के बोर्डाचे नियम डावलून केल्या पोलिसांच्या बदल्या; वकील इंद्रपाल सिंह यांचा ‘लोकशाही’वर गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीसांनी 75 टक्के बोर्डाचे नियम डावलून केल्या पोलिसांच्या बदल्या; वकील इंद्रपाल सिंह यांचा ‘लोकशाही’वर गौप्यस्फोट

Published by :
Published on

राज्यात पोलीसांच्या बदल्यांवरून राजकारण पेटले आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Parambeer Singh यांनी राजकीय दबावातून पोलीस बदल्या केल्याचा आरोप ताजा असताना, आता माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी 70 ते 75 टक्के पीईबी बोर्डाचे नियम डावलून पोलिसांच्या बदल्या केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांचे वकील इंद्रपाल सिंह Adv. indrapal Singh यांनी 'लोकशाही न्यूज'शी बोलताना केला आहे.

वकील इंद्रपाल सिंह Adv. indrapal Singh यांनी लोकशाही न्यूजशी बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. परमबीर सिंग Parambeer Singh यांनी राज्यातील पोलीस विभागात बदल्यांसाठीच्या याद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या, असा आरोप केला होता. या आरोपावर वकील इंद्रपाल सिंह Adv. indrapal Singh यांनी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकल्याचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच ईडी हे स्टेटमेंट करते हे धक्कादायक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस नियुक्त्यांवर बोलताना इंद्रपाल सिंह Adv. indrapal Singh यांनी नियुक्तीची संपुर्ण पद्धत सांगितली. पीईबी बोर्ड (Police Establishment Board) या समितीत पाच जण असतात. त्यात गृहमंत्र्यांचा समावेश नसतो. या बोर्डाला पोलीस नियुक्ती करण्याचा संपुर्ण अधिकार असतो. नियम 22N1 या नियमाप्रमाणे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी त्यांच्या जिल्हयातून काही शिफारशी गृहमंत्र्यांकडे पाठवतात, नंतर या गृहमंत्री या शिफारसीवर रफ यादी पीईबी बोर्डाला पाठवते. या रफ यादीतील शिफारसी बोर्डाच्या नियमात बसत असेल तर त्यांना मान्य़ता देण्यात येते, अन्यथा नाही, अशी माहिती इंद्रपाल सिंह Adv. indrapal Singh यांनी दिली.

अनिल देशमुख गृहमंत्री Anil deshmukh असताना 95 टक्के पीईबी बोर्डच्या नियमात राहून बदल्या केल्या गेल्या होत्या. तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना 70-75 टक्के बोर्डाला डावलून बदल्या केल्याचा आरोप इंद्रपाल सिंह Adv. indrapal Singh यांनी केला. कुठलेही नियम, कु़ठल्याही अधिकाराला न मानत स्वत;च्या अधिकारांचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्या केल्याचा गभीर आरोप इंद्रपाल सिंह Adv. indrapal Singh यांनी केला आहे. या आरोपावर आता देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com