महाराष्ट्र
Mucormycosis | राज्यात म्युकर मायकोसिसचे 7 हजार 998 रुग्ण; 729 मृत्यूंची नोंद
राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असतानाच, म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 7 हजार 998रूग्ण आढळले असुन, 729 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 4 हजार 398 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, 2 हजार 755 रूग्ण उपचारातून बरे झाले आहेत.
राज्याला म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी 9 हजार 374 अँफोटेरेसिन बी या इंजेक्शनचा 10 ते 15 जूनदरम्यान पुरवठा करण्यात आला आहे. यातील 96 इंजेक्शन शिल्लक असल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली आहे.