महाराष्ट्र
लॉकडाऊन काळात शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती अनिवार्य
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता औरंगाबादमध्ये 11 मार्च 14 एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती व ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. परंतू ऑनलाईन कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
10 वी व 12 वीची प्रात्यक्षिक परीक्षा व 8वी साठी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ठरलेल्या नियोजना नुसार घ्यावी. 50 टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन अध्यापन करावे. शिक्षकांनी स्टाफ रूम किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.