Maharashtra Corona । महाराष्ट्रात ५ हजार ६०९ नवे बाधित; १३७ रूग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. कारण दररोज आता कोरोना रुग्णांचा आकडा खालावत चालला आहे. त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यसरकारसह आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात दिवसभारत ५ हजार ६०९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ७२० रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६१ लाख ५९ हजार ६७६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८ टक्के एवढे झाले आहे. आज १३७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत १ लाख ३४ हजार २०१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६६,१२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.