धक्कादायक! थेट छताचा पत्रा कापून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ४ लाखांची रक्कम लंपास

धक्कादायक! थेट छताचा पत्रा कापून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ४ लाखांची रक्कम लंपास

ज्वेलर्स दुकानाचा छताचा थेट पत्रा कापून दुकानात धाडसी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
Published on

संजय देसाई | सांगली : ज्वेलर्स दुकानाचा छताचा थेट पत्रा कापून दुकानात धाडसी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मिरज शहरातील सराफ कट्टा रस्त्यावरील आर के ज्वेलर्स दुकानात ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी चार तोळे सोने आणि सात किलो चांदी असा साडेपाच लाखाचा ऐवज लंपास केला. मध्यरात्री हा प्रकार घडला असून याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धक्कादायक! थेट छताचा पत्रा कापून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ४ लाखांची रक्कम लंपास
नवा कायदा निवडणूक आयोगाला गुलाम करणारा; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

माहितीनुसार, मिरजेतील सराफ कट्टा येथे राहुल कदम यांचे आर के ज्वेलर्स नावाची सराफी दुकान आहे. रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी छतावरील पत्रे काढून दुकानात प्रवेश करून दुकानातील 4 तोळे सोने व सात किलो चांदीचा ऐवज लंपास केला. सकाळी राहुल कदम यांनी आपले दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी छताचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्हीची वायर कापून शोकेस मधील चार तोळे सोन्याचे दागिने चांदीचे सात किलो दागिने चोरून नेले. सोन्याचे आणखी दागिने लोखंडी तिजोरीत असलेले ते बचावले.

चोरट्यांनी पत्रा कापण्यासाठी वापरलेला कटर दुकानात सापडले आहे. चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान पथक तेथून दोनशे मीटर अंतरावर जाऊन तेथेच घुटमळल्याने चोरटे तेथून वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला असून मध्यरात्री दोन वाजता सीसीटीव्हीची वायर कापल्याचे निदर्शनास आले. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com