युक्रेनवरून 218 भावी डॉक्टर मायदेशी; विमानतळावर महापौरांनी केली विद्यार्थ्यांची चौकशी
युक्रेनवरून 218 विद्यार्थ्यांना घेऊन येणार विमान मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या या विद्यार्थ्य़ांचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वागत करत त्यांची काळजीपुर्वक चौकशी केली.
युक्रेन-रशियात सध्या संघर्ष सूरू आहे. यात रशियाकडून युक्रेनवर गेल्या काही दिवसांपासून हल्ले केले जात आहेत. याच युक्रेनमध्ये भारताचे असंख्य विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताचे शर्थीचे प्रयत्न सूरू होते.याच प्रयत्नाचा भाग म्हणून आज 218 भावी डॉक्टरांना युक्रेनवरून घेऊन येणारे विमान आज सायंकाळी मुंबईत दाखल झाले आहे.
या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्य़ा. यावेळी मायदेशी उतरलेल्या या विद्यार्थ्यांचे किशोरी पेडणेकर यांनी स्वागत करत त्यांची काळजीपुर्वक चौकशी केली. तत्पूर्वी त्या विद्यार्थ्यांसाठी अन्न, त्यांची आरोग्य तपासणी, त्यांच्या साठी मदतकक्ष व इतर सुविधांची माहिती घेतली.