200 हेक्टर शेतीला फटका; हाताशी आलेला धान बुडाला

200 हेक्टर शेतीला फटका; हाताशी आलेला धान बुडाला

Published on

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातिल महत्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या गोसिखुर्द धरनाचे पाणी पातळी वाढण्याची प्रक्रिया सुरु असल्याने भंडारा जिल्हातिल अनेक गावातिल शेतजमीनी गोसिखुर्द धरणाच्या बैक वॉटर पाण्याखाली आल्या. दरम्यान अंदाजे 200 हेक्टर शेतातिल धान पिकाला फटका बसला आहे.

भंडारा तालुक्यासह पवनी तालुक्यातिल बेला, दवडीपार, कोरंभी, सालेबर्डी अश्या अनेक गावाला ह्यांच्या फटका बसला आहे. गोसिखुर्द धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सद्धा ह्या प्रकल्पात 244.500 मिटर पाणी पातळी आहे. ह्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्याप ही संपादित न झालेल्या शेतात पाणी शिरले आहे. त्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर जिल्हा प्रशासनाने ह्याची गम्भीर दखल घेतली असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरु झाले आहे. त्यांमुळे नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com