19 दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाचे काम ठप्प, असं सरकार चालतं; चंद्रकांत पाटलांची टीका
अमोल धर्माधिकारी | गेले 19 दिवस मुख्यमंत्रिपदाचे काम ठप्प आहे. त्यांनी आपला पदभार अन्य कोणाकडे सोपविलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारे सरकार चालू शकत नाही,असा घणाघाता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, यानिमित्त पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा पंचनामा केला.
राज्याला 10 महिने झाले विधानसभा अध्यक्ष नाही, 19 दिवस झाले मुख्यमंत्री फील्डवर नाही असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी म्हणत पुन्हा ते किती दिवसांनी फील्डवर येतील याबाबत साशंकता आहे असं मोठं विधान पाटलांनी केलं आहे, मात्र मुख्यमंत्री माझे जवळचे आहे,विद्यार्थी दशेपासून आमची मैत्री आहे,त्यामुळे ते लवकर बरे व्हावेत अशी आई अंबाबाईच्या चरणी आणि कसबा गणपतीला प्रार्थना करतो अस ही ते म्हणालेत.
यावेळी चंद्रकांत पाटलांनी बोलताना म्हंटले की राज्याला एक परंपरा असून तीन दिवस नसेल तर काळजीवाहू मुख्यमंत्री असतो,मात्र इथे तस काहीच नाही, याबाबत एक उदाहरण देताना पाटील म्हणाले की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानवंदना देयची होती मात्र त्या फाईल वर सही करण्यासाठी पाच तास लागले त्यानंतर मुख्यमंत्री यांनी सही केली.