पोलिस बदल्यांच्या यादीवर बोगस, वाळू तस्कर, गुड, बरा असा शेरा : काय आहे प्रकार?
जालना
पोलिस बदल्यांच्या (Police transfer)यादीवर बोगस, वाळू तस्कर, गुड, बरा असा शेरा असल्याचा एक्सक्लुझिव्ह अहवाल 'लोकशाही' न्यूजच्या (Lokshahi News)हाती लागलायं. जालना जिल्ह्यातील (Jalana) विविध ठाण्यांसह शाखांतून मागील वर्षी 180 पोलिस (Police)कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यातील काही बदल्या लोकप्रतिधी, गुत्तेदारांच्या शिफारसीवरून झाल्या.
राज्यभरात पोलिस बदल्यांची नेहमीच चर्चा होत असते. अनेक जण हव्या त्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून राजकीय वजन वापरतात. त्याचबरोबर यामध्ये आर्थिक व्यवहारही होत असतो. कोरोनाकाळात काही वर्षे बदल्या थांबल्या होत्या. कोरोना कमी होताच बदल्यांची चर्चा रंगली होती. सुरुवातीला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. पोलिस खात्यातील बदल्यांची नेहमीच चर्चा असते. कोणता अधिकारी, कर्मचारी कुठे गेला, स्थानिक गुन्हे शाखेत कुणाची वर्णी लागली याची उत्सुकता सर्वांनाच असते. अनेक जण हव्या त्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून त्यांचे राजकीय वजन देखील वापरत असतात. तर अनेकदा बदल्यांसाठी आर्थिक व्यवहारही होतात.
असे असतात बदल्यांचे निकष
पोलिस बदल्यांसाठी असलेल्या निकषात पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेले हवे. तसेच काही विनंती बदल्या असतात. इतर कारणास्तव पोलिस नाईक, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबलच्या बदल्या होतात. बदल्याची प्रक्रिया सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या अथवा जवळील व्यक्तींच्या शिफारशीवर बदल्या होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
जालना जिल्ह्यात मागच्या वर्षी 180 पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात अनेक बदल्या या लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून झाल्या आहेत. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावापुढे बोगस, वाळू तस्कर, गुड, बरा असा शेरा मारण्यात आला आहे.