वर्ध्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 15 बकऱ्या ठार

वर्ध्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 15 बकऱ्या ठार

Published by :
Published on

भूपेश बारंगे | वर्ध्यातील पिंपळगाव येथे शेतातील गोठ्यात असलेल्या बकऱ्यावर वन्यप्राणी तडस या जातीच्या प्राण्यांचा हल्ल्यात 15 बकऱ्या ठार झाल्याने वृषभ जाधव या सुशिक्षित युवकाचे मोठं नुकसान झाले आहे.

देवळी तालुक्यातील पिंपळगाव येथील सुशिक्षित वृषभ राजू जाधव या युवकाने शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केला, जवळपास त्यांच्याकडे 70 बकऱ्या आहे. यात एका गोठयात 15 पिल्ले सोबत एक बकरी होती याच गोठयात वन्यप्राणी तडस घुसून 15 बकऱ्यांना ठार केले. जवळपास 2 लाखाचे नुकसान झाले.या घटनेची माहिती वनविभागला देण्यात आली.

वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.यावेळी तडस जातीच्या वन्यप्राण्याने बकऱ्यावर हल्ला करून ठार केले असावे असा अंदाज वर्तविण्यात आला. पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर सर्वच बकऱ्याचे शवविच्छेदन केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com