महाविद्यालयाच्या परिसरात गांजाची १४२ झाडं; पोलीसाच्या कारवाईनंतर धक्कादायक कारण आलं समोर
अमोल नांदूरकर, अकोला
अकोल्यातील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बागीच्यामध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक समोर आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 142 गांजाची लागवड करण्याता आली होती. आता पोलिसांच्या विशेष पथकाने येथे कारवाई करून सर्व झाड तोडत जप्त केली आहेत. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या प्रकाश सुखदेव सौंधले याला याप्रकरणी अटक केली आहे.
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या परिसरातील बगीच्यामध्ये गांजाची झाडांची लागवड केली गेली. आर्थिक फायद्यासाठी महाविद्यालयाच्या रखवाल्यानेच हि गांजाची झाडे लावली. गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनही त्याने अवैध पद्धतीने गांजाची लागवड केली होती.
या घटनेची माहिती अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जि. श्रीधर विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली असता,त्यांनी आज शनिवारी दुपारी महाविद्यालयाच्या परिसरात कारवाई केली आहे. या दरम्यान, तब्बल १४२ गांजाची झाडे लागवड केल्याच निदर्शनास आले. या प्रकरणी महाविद्यालयचा रखवाला प्रकाश सुखदेव सौंधले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या गांजाची झाडाची उंची एक ते सात फुटापर्यंत अशी आहे. ज्याचे वजन ४० किलो ग्रॅम इतके असून जवळपास चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सौंधले विरुद्ध पातुर पोलिसांतं एनडीपीएस अन्वेयनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.