११ हजार साईभक्तांनी घेतला साईदर्शनाचा लाभ

११ हजार साईभक्तांनी घेतला साईदर्शनाचा लाभ

Published by :
Published on

कुणाल जमदाडे, शिर्डी | राज्‍य शासनाच्‍या आदेशाने आज दिनांक ०७ ऑक्‍टोबर पासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले असून दिवसभरात सुमारे ११ हजार साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

आज पहाटे साईभक्‍तांना गेट नंबर ०२ मधुन श्रींच्‍या काकड आरती व दर्शनाकरीता प्रवेश देण्‍यात आला. लॉकडाऊननंतर सुमारे ५ महिन्‍याने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आल्‍यामुळे भक्‍तांच्‍या अतिउत्‍सहामुळे दिवसभरात ११ हजार साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये शिर्डी ग्रामस्‍थ व शिर्डी पंच्‍यक्रोशितील भाविकांचा मोठयाप्रमाणात सहभाग होता. तर बेंगलौर येथील देणगीदार साईभक्‍त सतिष चिप्‍पालाकट्टी यांच्‍या देणगीतुन मंदिर व मंदिर परिसरासह दर्शन रांगेत फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली होती. तसेच साईभक्‍तांव्‍दारे देणगी कार्यालयात सुमारे ०८ लाख रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याचे बानायत यांनी सांगितले.

श्री साईबाबांचे मंदिर खुले झाल्‍यामुळे व संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आलेल्‍या उपाययोजनांबाबत साईभक्‍तांकडून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे. तसेच कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करताना यशस्‍वीपणे नियोजन करण्‍यासाठी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलिप उगले, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी हे प्रयत्‍नशिल आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com