10वी, 12वी बोर्ड परीक्षा ऑफलाइन व वेळापत्रकानुसारच होणार

10वी, 12वी बोर्ड परीक्षा ऑफलाइन व वेळापत्रकानुसारच होणार

Published by :
Published on

शालेय शिक्षणमंत्री वर्षा यांनी दहावी बारावी बोर्ड परिक्षेबाबत पालक संघटना, शिक्षक, बोर्डाचे आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी बैठक घेतली. यामध्ये शिक्षणमंत्र्यांनी बोर्ड परिक्षेबाबत पालक, शिक्षकांचे म्हणणे जाणून घेतले. शिवाय, विविध विषय आणि बोर्ड परीक्षा आयोजनाबाबत चर्चा केली. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांचा विचार करता बोर्डाला एकाच निर्णय घ्यावा लागणार त्यामुळे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्या लागणार आहेत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीत पालकांना समजून सांगितले.

दहावी बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे शक्य नाही. कारण वेळापत्रकबाबत आपण हरकती आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर सर्व बाजूने विचार करून हे वेळापत्रक तयार केले आहे. यामध्ये महत्वच्या 2 विषयामध्ये गॅप देण्याचा प्रयत्न केला आहे. समजा, काही विद्यार्थी अडचणीमुळे किंवा कोव्हिडमुळे परीक्षा देऊ शकले नाही. तर लगेच आपण त्यांची परीक्षा घेणार आहोत. ही परीक्षा झाल्यावर लगेच पुढील परीक्षा घेण्याचे नियोजन करणार आहोत त्यामुळे विद्यार्थी पालकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रममध्ये बद्दल ऐनवेळी होणे शक्य नाही. त्यामुळे ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचा सध्यातरी विचार बोर्डाने केला आहे. परीक्षा आयोजन आणि नियोजनाबाबत सल्लागार समिती विचार करून परिस्थितीचा विचार करून निर्णय घेत आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com