हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले असून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सुमित देशमुख, जळगाव

हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले असून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याची आवक वाढल्याने हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने नदी काठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

38846 क्युसेक इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत 60,000ते 70,000क्युसेक पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com