Covid-19 updates
Maharashtra Corona; दिलासादायक! ॲक्टिव्ह रुग्ण संख्या घटली
गेल्या काही दिवसांपासून लाखावर असलेली ॲक्टिव्ह रुग्ण आता घटली आहे. लाखाच्या पल्ल्याआड असलेली संख्या आता हाजारांवर आली आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे.
राज्यात आज रोजी एकूण ९४ हजार ५९३ ॲक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लाखावर असलेला आकडा आता हजारावर आला आहे. गेल्या 24 तासात ६ हजार ९१० नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात ७ हजार ५१० रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६० लाख ९११ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.
आज १४७ कोरोनबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.आतापर्यंत १ लाख ३० हजार ७५३ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.