Maharashtra Corona| दिलासादायक! नवीन बाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण झाले बरे

Maharashtra Corona| दिलासादायक! नवीन बाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण झाले बरे

Published by :
Published on

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच आज काहीसा दिलासा मिळाला असल्याचे म्हणता येईंल. आज नवीन बाधितांच्या आकड्यातही काहीशी घट झाली आहे, त्याचबरोबर रुग्ण बरे झाल्याचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे राज्यसरकारसह आरोग्य विभागासाठी ही दिलासादायक बाब आहे.

राज्यात सध्या 1 लाख 8 हजार 343 अॅक्टीव रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 7 हजार 603 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यत 61 लाख 65 हजार 402 एकूण रुग्णसंख्या झाली आहे. आज 15 ह्जार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतपर्यत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59 लाख 27 हजार 756 वर पोहोचली आहे. आज 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 1 लाख 26 हजार 24 झाली आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com