India
आदित्यनाथ यांनी स्वीकारलं ओवैसींचं ‘ते’ चॅलेंज
कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं वक्तव्य ओवैसी यांनी केलं होतं. ओवेसी हे मोठे नेते आहेत आणि ते देशात प्रचारही करतात. त्यांना एका विशेस समाजाचं समर्थनही आहे. परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देऊ शकत नाही. भाजपं आपली मूल्ये आणि मुद्दे घेऊन निवडणुकांच्या मैदानात असेल. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकार करतो," असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
त्यांनी म्हटलं आम्ही येऊ देणार नाही, तो भाजपही हे सांगेल की २०२२ च्या निवडणुकांमध्ये भाजपचं जिंकेल आणि भाजपचंच सरकार स्थापन होईल. ओवेसी यांचा स्वत:चा एक पक्ष आहे. ते आपल्या मुद्द्यांवर निवडणुका लढवतील आणि आम्ही आमच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवू," असं योगी आदित्यनाथ म्हणाले.