महागाईचा भडका ; LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशीचं सर्वसामान्य जनतेला झटका मिळाला आहे. देशांतर्गत एलपीजी किमत प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ झाली होती. केवळ फेब्रुवारीमध्ये सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाले होते. फक्त 26 दिवसांत एलपीजी 125 रुपयांनी महागला आहे.
आयओसीने (IOC) फेब्रुवारी महिन्यात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ केली. प्रथम 4 फेब्रुवारीला, दुसऱ्यांदा 14 फेब्रुवारीला आणि तिसऱ्यांदा 25 फेब्रुवारीला किंमत 25 रुपयांनी वाढविण्यात आली. आज मार्चच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे.
दिल्लीत अनुदानित एलपीजी सिलिंडर आता 819 रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही एलपीजी सिलिंडरसाठी 819 रुपये द्यावे लागतील. एलपीजी सिलिंडरसाठी कोलकाताला जास्तीत जास्त 845.50 रुपये द्यावे लागतील, चेन्नईमध्ये ग्राहकांना एलपीजी सिलिंडरसाठी 835 रुपये द्यावे लागणार आहेत.