IND vs PAK Womens World Cup: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

IND vs PAK Womens World Cup: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Published by :
Vikrant Shinde
Published on

IND vs PAK Womens World Cup: सध्या महिला क्रीकेट विश्वचषक सुरू आहे. न्यूझीलंड मध्ये सुरू असलेल्या विश्वचषकामध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना रंगला. क्रीकेटमध्ये भारत-पाकिस्तान सामना म्हणजे अतिशय चुरशीची लढत मानली जाते.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला अक्षरश: धूळ चारली आहे. भारताने 107 धावांनी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 244 धावा करत पाकिस्तानसमोर 245 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, पाकिस्तानी संघाला ते पेलता आलं नाही. पाकिस्तानी संघ 137 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने तुफान गोलंदाजी करत हा सामना खिशात घातला आहे.

भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. फलंदाज वैशाली शर्मा खाते न उघडताच बाद झाली. मात्र, त्यानंतर स्मृती मंधाना, स्नेह राणा आणि नवोदित पूजा वस्त्राकरच्या अर्धशतकी खेळीने भारताचे सामन्यात पुनरामगन झाले. त्यामुळे टीम इंडियाला 244 इतकी धावसंख्या गाठता आली.


भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजांपैकी कोणालाही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानी संघ 137 धावांवर ऑलआऊट झाल्याने, भारतीय संघाचा 107 धावांनी दणदणीत विजय झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com