Deepak chahar
Deepak chahar

दीपक चहरची आयपीएलमधून माघार; 'हे' आहे कारण

Published by :
Saurabh Gondhali
Published on

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर (Deepak Chahar) याने दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून (IPL 2022) माघार घेतली आहे. त्याने एक संदेश देत आपल्या चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, लवकरात लवकर तब्येत सुधारून आपण पुन्हा क्रिकेट खेळू असे त्याने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. मला खेळायचे होते पण माझ्या दुखापतीमुळे यंदा मी खेळू शकणार नाही. आता मी अधिक तयारी करेन आणि मजबूत होऊन परत येईल. आपल्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी खरंच आभार मानतो. आपल्या प्रार्थनांची गरज आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दीपक चहरला कोलकातामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या T-20 मालिकेदरम्यान पायाला दुखापत झाली होती. दीपकच्या क्वाड्रिसेप्स स्नायुना दुखापत झाली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे उपचार घेत होता. पायाची दुखापत झपाट्याने बरी होत आले होते, पण तेव्हाच दीपकच्या पाठीला दुखापत झाली.

आयपीएल मेगा लिलावात दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींमध्ये खरेदी केले आहे. या हंगामातील लिलावात चहर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. गेल्या हंगामात दीपक चेन्नईचा एक भाग होता, पण फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. मेगा ऑक्शनमध्ये मोठी बोली लावून दीपकला पुन्हा संघात सामील करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com