जाणून घ्या का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन?

जाणून घ्या का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन?

जागतिक लोकसंख्या दिन जगभरात 11 जुलै रोजी साजरा करण्यात येतो.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जागतिक लोकसंख्या दिन जगभरात 11 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघटनेने याची दखल घेवून 1989 सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून करण्यात येतो.

11 जुलै 1990 रोजी हा दिवस पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून, अनेक UNFPA राष्ट्रीय कार्यालये तसेच इतर संस्था आणि संस्थांनी सरकार आणि नागरी समाज यांच्या सहकार्याने जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला आहे.

या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केलं जातं. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com