Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला का घालतात काळे कपडे; जाणून घ्या

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला का घालतात काळे कपडे; जाणून घ्या

मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशभरात मकर संक्रात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून शनिचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा आणि रात्र लहान होते. नववर्षातला पहिला सण मोठ्या उत्साहने साजरा केला जातो.

सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात. एक राशीला सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. मकरसंक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो. काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे घालण्याची प्रथा आहे.

नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात. काळ्या रंगाची वस्त्रे उष्णता शोषून घेऊन शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. म्हणून ते परिधान केले जातात.

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला का घालतात काळे कपडे; जाणून घ्या
'या' पद्धतीने बनवा भोगीची स्पेशल भाजी; वाचा रेसिपी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com