World Book Day: 'जागतिक पुस्तक दिन' यासाठी याच तारखेची निवड का करणयात आली?

World Book Day: 'जागतिक पुस्तक दिन' यासाठी याच तारखेची निवड का करणयात आली?

अनेकांना आजच्या दिवशी 'वर्ल्ड बूक डे' का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्त्व काय हे माहित नाही. त्यामुळे या दिवसामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेऊयात.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

संपूर्ण जगभरात 23 एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा केला जातो. त्यामुळे आज सकाळपासूनच सोशल मीडियावर #World Book Day हा हॅशटॅग ट्रेण्ड होतांना दिसत आहे. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचं खास उद्दिष्ट्य आहे. खरंतर अनेकांना आजच्या दिवशी 'वर्ल्ड बूक डे' का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्त्व काय हे माहित नाही. त्यामुळे या दिवसामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेऊयात.

23 एप्रिल याच तारखेची निवड का ?

विल्यम शेक्सपिअर, इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन 23 एप्रिल याच दिवशी झालं. त्यामुळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस प्रथम 23 एप्रिल 1923 मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर 1995 मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.

कसा साजरा केला जातो हा दिवस?

हा दिवस प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी विनामूल्य पुस्तकांची विक्री केली जाते. काही ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तर, काही ठिकाणी वाचनालयांमध्ये एक दिवस मोफत पुस्तके वाचायला दिली जातात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com