World Environment Day 2024: 'जागतिक पर्यावरण दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या

World Environment Day 2024: 'जागतिक पर्यावरण दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या

दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पर्यावरण हा शब्द परि आणि आवरण या दोन शब्दांनी बनलेला आहे ज्यामध्ये परि म्हणजे आपल्या अवतीभवती किंवा आपल्या सभोवताली.आवरण म्हणजे आपल्या सभोवताल जे व्यापले आहे. पर्यावरण हे वातावरण,हवामान,स्वच्छता,प्रदूषण आणि झाडांपासून बनलेले आहे.सर्व गोष्टी म्हणजेच पर्यावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो.

मनुष्य आणि पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहे. प्रदूषण किंवा झाडांची कमतरता या पर्यावरणीय प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी शरीरावर आणि आरोग्यावर होतो. मानवाच्या चांगल्या सवयी जसे की झाडांची जोपासना करणे. प्रदूषण रोखणे,स्वच्छता राखणे या साऱ्या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात. मानवाच्या वाईट सवयी जसे की, पाणी घाण करणे, पाण्याचे अपव्यय करणे, झाडे कापणे, या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात. याचा परिणाम म्हणजे नैसर्गिक आपत्तींना सामोरी जावे लागते.

संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला हा दिवस जागतिक पातळीवर पर्यावरणा विषयी जागरूकता आणण्यासाठी साजरा केला जातो. याची सुरुवात 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 5 जून ते 16 जून या कालावधीत आयोजित जागतिक पर्यावरण परिषदेत केली. पहिला जागतिक पर्यावरण दिन 5 जून 1973 रोजी साजरा करण्यात आला. मानव हा पर्यावरणाचा एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाचा प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरण आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com