Children’s Day: 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून का साजरा करतात?

Children’s Day: 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून का साजरा करतात?

आज 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन देशभरात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. जगभरात इतर देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला हा दिवसा साजरा करण्यात येतो. केवळ भारतातमध्येच बालदिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो.
Published by :
Team Lokshahi
Published on

वर्षभरातील 365 दिवसांचा अभ्यास केला तर प्रत्येक दिवशी काही ना काही खास असतंच त्यापैकीच आजचा 14 नोव्हेंबर हा दिवस देशभरात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज इथे त्यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. पण भारतातल्या अनेक, किंबहुना प्रत्येक ब्रिजवर ही अशी उमलण्यापूर्वीच कोमेजून गेलेली मुलं दिसतात, तेव्हा प्रत्येक नागरिकाचा जीव कासावीस होतो. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. बालदिनाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि हा दिवस कधीपासून साजरा केला जातो याबाबत जाणून घेऊया.

शेवटी हीसुद्धा मुलंच. कधीतरी एखादी गोष्ट त्यांच्या मनात भरते. आपल्याकडेही ती असावी, असंही त्यांना वाटत असेल. पण, या सगळ्या इच्छा आकांक्षांना मुरड़ घालण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो. सगळ्याचं जीवन प्रकाशमान करणा-या सूर्याला ही मुलं साद घालतायत. आमच्या आयुष्यातला अज्ञानाचा, गरिबीचा अंधार दूर होऊ दे, अशी प्रार्थना ते सूर्यनारायणाला करत आहेत. शाळेत जाण्याची संधी मिळाली, तसाच पुढचा मार्गही सोपा होऊ दे, हीच त्यांची इच्छा असणार!

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 131 वी जयंती आणि बालदिन देशभरात साजरा केला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना मुलांबद्दल खूप आपुलकी, प्रेम आणि आपुलकी होती. त्यांनी मुले हीच राष्ट्राची खरी ताकद आणि समाजाचा पाया मानली. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुलंही नेहरूजींना चाचा नेहरू म्हणत. या देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यात चाचा नेहरूंचे महत्त्वाचे योगदान होते. ते महान स्वातंत्र्यसैनिक होते. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची क्षमता आणि नेतृत्व क्षमता पाहून त्यांच्याकडे देशाची धुरा सोपवण्यात आली. त्यांनी कठीण परिस्थितीत देशाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आणि देशाने प्रगतीकडे वाटचाल केली. आज त्यांना स्मरण करण्याचा आणि त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे.

चाचा नेहरू म्हणायचे की आजची मुलं उद्याचा भारत घडवतील, आपण मुलांची जितकी काळजी घेऊ तितकी राष्ट्राची उभारणी होईल. म्हणूनच या दिवशी आपण बाल कल्याणाविषयी बोललो नाही तर ते योग्य होणार नाही. खरे तर बालदिन सुरू करण्याचा खरा उद्देश मुलांच्या गरजा ओळखणे, त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांचे शोषण रोखणे हा होता, जेणेकरून मुलांचा योग्य विकास होऊ शकेल. पण सत्य हे आहे की आजही देशातील हजारो मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. त्यांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळत नाही. बालमजुरीची समस्या प्रत्येक राज्यात पाहायला मिळत आहे. लहान मुलांना कारखाने, दुकाने, हॉटेल आदी ठिकाणी मजुरांसारखे काम करायला लावले जात आहे. या बालदिनानिमित्त आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण जमेल त्या मार्गाने बाल अत्याचार आणि बालमजुरी थांबवू. वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com