Indian Currency : भारतीय नोटांवर गांधीजींचाच फोटो का बरं?
एखाद्याला महात्मा गांधींचे विचार, तत्त्वज्ञान आवडो न आवडो पण नोटांवरील गांधीजी आवडतातच. भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधीजींचाच फोटो का बरं? अनेक बड्या नेत्यांनी विज्ञान, सिनेमा, कला, राजकारण क्षेत्रात योगदान दिलं तरी महात्मा गांधींच्याच (Mahatma Gandhi ) फोटोला नोटेवर स्थान का मिळालं? यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...
दरम्यान भारतीय नोटांवर (Notes) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या फोटोसोबत आता रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) आणि एपीजे कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांचे फोटो दिसणार होते. मात्र यावर भारतीय चलनावरील महात्मा गांधी यांची प्रतिमा बदलण्याचा कुठलाही विचार नसल्याचं रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट केलं आहे.
प्रत्येक देशाची केंद्रीय बँक त्या त्या देशाचं चलन प्रसिद्ध करत असते. भारतामध्ये नोटा प्रसिद्ध करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेला आहेत. एक रुपयाची नोट भारत सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात येते.
गांधीजींच्या चित्रासह नोटा कधी छापल्या गेल्या?
नोटांवर गांधीजींचे चित्र प्रथम 1969 मध्ये छापण्यात आले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चित्र नोटांवर छापले. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात असलेल्या सेवाग्राम आश्रमाचे चित्रही त्याच्या मागे होते. या आश्रमात गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाची 14 वर्षे व्यतीत केली होती. तथापि, नंतर त्याचे चित्र अनेक नोटांवर छापले जाऊ लागले.
गांधीजींचे हे चित्र कुठले आहे?
नोटांवर छापलेले महात्मा गांधींचे छायाचित्र सध्याच्या राष्ट्रपती भवनात म्हणजेच 1946 मध्ये व्हाईसराय हाऊसमध्ये काढण्यात आले होते, जेव्हा गांधीजी म्यानमार म्हणजेच तत्कालीन सचिव फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. तिथेच त्यांचा फोटो काढला होता. फोटो कोणी काढला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या नवीन नोटांचे रंग बरेच बदलले आहेत. मात्र गांधीजींचे हसणारे चित्रात काही बदल झाला नाही.
भारतात चलनी नोटांमध्ये मोठा बदल
गेल्या काही वर्षांत भारतात चलनी नोटांमध्ये मोठा बदल झाला आहे. 2016 मध्ये तर नोटबंदीने 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्या आणि त्यानंतर 10 रुपयांपासून 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. मात्र गेल्या काही वर्षांत नोटांवर असलेलं महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे चित्र बदललं नाही. गांधीजींचा हा फोटो नोटेवर 1996 मध्ये आल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर 5, 10, 20, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. दरम्यान तोपर्यंत अशोक स्तंभाच्या जागी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आणि नोटेच्या एका बाजूला खाली अशोक स्तंभ छापला.
कसा झाला रुपयाचा प्रवास?
भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण देश 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा प्रसिद्ध करायला सुरुवात केली.
रुपयाच्या जुन्या नोटा
रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर असणाऱ्या माहितीनुसार, 1949 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेचं नवीन डिझाईन तयार केलं. यानंतर आता स्वतंत्र भारतासाठीचं नवं चिन्हं निवडायचं होतं.
1950 मध्ये भारतीय प्रजासत्ताकात पहिल्यांदाच 2, 5, 10 आणि शंभर रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या.
2, 5 आणि शंभर नोटेच्या डिझाईनमध्ये फारसा फरक नव्हता, पण रंग वेगवेगळे होते. 10 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूला शिडाच्या होडीचा फोटो तसाच ठेवण्यात आला होता.
1953 मध्ये नवीन चलनी नोटांवर हिंदी प्रामुख्याने छापण्यात आली. रुपयाचं बहुवचन काय असेल, याविषयी चर्चा झाली आणि रुपयाचं बहुवचन 'रुपये' असेल असं ठरलं.
1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा छापण्यात आल्या. 1978 मध्ये या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.
म्हणजे 1978 मध्ये एक हजार, पाच हजार आणि 10 हजार रुपयांची नोटबंदी झाली होती.
दोन आणि पाच रुपयांच्या लहान चलनी नोटांवर सिंह, हरीण अशा प्राण्यांचे फोटो छापण्यात आले होते. पण 1975 मध्ये 100 च्या नोटेवर कृषी स्वावलंबन आणि चहाच्या मळ्यातून पानं खुडतानाचे फोटो दिसू लागले.
महात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.
20 रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा 1972 मध्ये चलनात आणली आणि याच्या तीन वर्षांनंतर 1975 मध्ये 50 ची नोट चलनात आणण्यात आली.
9 ऑक्टोबर 2000 रोजी एक हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली.
भारतीय चलनामध्ये सगळ्यात मोठा बदल दुसऱ्यांदा नोव्हेंबर 2016 ला करण्यात आला. 8 नोव्हेंबर 2016 ला महात्मा गांधी सीरीजच्या 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा अवैध घोषित करण्यात आल्या.
यानंतर 2000 रुपयांची नवीन नोट चलनात आणली गेली. यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र आहे.