Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमा कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा पध्दत

Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमा कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा पध्दत

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते.
Published by :
shweta walge
Published on

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खुप जवळ येतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने खुप मोठा दिसतो.

या दिवशी चंद्रप्रकाशात खीर तयार केली जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते. देवी लक्ष्मी या कोण जागी आहे आणि तिची पूजा करत आहे. पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात.

शरद पौर्णिमेचे महत्त्व

शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. याला कोजागरी पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असेही म्हणतात. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. या दिवशी लोक लक्ष्मी देवीची भक्तीभावाने पूजा करतात. या दिवशी चंद्र त्याच्या सर्व १६ टप्प्यांनी भरलेला असतो आणि त्याची किरणं अमृताचा वर्षाव करतात. त्यामुळे खीर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती देवी लक्ष्मीला अर्पण करुन प्रसाद म्हणून दिली जाते.

शरद पौर्णमा तिथी

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होईल आणि १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजून ५० समाप्त होईल. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे.

अशी करावी पूजा

सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छकपडे परिधान करावे. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. मंदिराची स्वच्छता करून लाल कपडा पसरावा आणि त्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवावा. त्यानंतर देवीची पूजा करावी. चंद्रदयानंतर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर दूध किंवा खीरचा नैवेद्य दाखवावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com