तुलसीदासांनी कारागृहात लिहिली हनुमान चालिसा; जाणून घ्या काय होतं कारण
राज्यातील राजकारण हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे निघणार नसतील तर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आदेश मनसे सैनिकांना दिले. त्यानंतर सरकारी पातळीवरून विरोधकापर्यंत या विषयावर राजकारण सुरु आहे. परंतु हनुमान चालीसा कधी व कोणी लिहिली, हे तुम्हाला माहीत आहे का? हनुमान चालीसा तुलसीदाजींनी कारागृहात लिहिली.
सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात. पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.
गोष्ट इ.स. १६०० ची आहे. अकबर राजा (Akbar) होता. एकदा तुलसीदासजी (Tulsidasji) मथुरेला जात होते. रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली. सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे?
तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, त्यांनी रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहेत. अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे, असे सांगितले. सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा. हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध? त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.
हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले,आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्लात आणण्याचा आदेश दिला. तेव्हां, बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला. पण अकबराला ते मान्य नव्हते आणि तुळशीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की, तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करा.
तुलसीदासजी म्हणाले- मी फक्त भगवान श्रीरामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल. हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे? तेव्हां, बिरबल म्हणाला, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते.पण तुम्हीं तर सहमत नाहीं झाले,आणि करिश्माला बघायचं असेल तर आता बघाच...!
अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले आणि साखळ्या उघडल्या गेल्या. तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की, मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधारकोठडीतील भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.
हनुमान चालीसा हा जगातील सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ मानला जातो. यात हनुमानाचे गुण आणि कर्तृत्व वर्णन केले आहे. या चालीसामध्ये हे वर्णन चाळीस चौपैंमध्ये दिलेले आहे, म्हणूनच याला चालीसा म्हटले गेले. यात 40 श्लोकही आहेत.
हे आहे विशेष
हनुमान चालीसाची सुरुवात दोन जोड्यांपासून होते. ज्यांचा पहिला शब्द 'श्रीगुरु' आहे. ज्यामध्ये श्रीचा संदर्भ सीता माता आहे जिला हनुमानजी आपले गुरु मानत होते. हनुमान चालिसाच्या पहिल्या 10 चौप्या त्यांच्या शक्ती आणि ज्ञानाचे वर्णन करतात. 11 ते 20 पर्यंतच्या चौपईमध्ये त्यांच्या भगवान रामाबद्दल सांगितले आहे, ज्यामध्ये 11 ते 15 मधील चौपई भगवान रामाचा भाऊ लक्ष्मण यांच्यावर आधारित आहे. शेवटच्या चौपाईमध्ये तुलसीदासांनी हनुमानजींच्या कृपेबद्दल सांगितले आहे.