आज काय घडले : महाराष्ट्र साहित्य परिषदेची निर्मिती
महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना झाली. मसाप ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था आहे.
सुविचार
कोणत्याही कामामध्ये नम्रतेने सामील व्हा आणि वेळ ओळखून दिमाखाने बाहेर पडा, भाग्य स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल.
आज काय घडले
१९०६ मध्ये मसाप अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना झाली. मसाप ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था आहे.
१९६४ मध्ये गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. ते ९ जून १९६४ पर्यंत हंगामी पंतप्रधान होते.
२०१६ मध्ये हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती ठरले.
आज यांचा जन्म
चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा १९१३ मध्ये जन्म झाला. ते लेखक, कवी, नाटककारही होते.
परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणारे भालचंद्र नेमाडे यांचा १९३८ मध्ये जन्म झाला. जळगाव जिल्ह्यातील सांगवीत त्यांचा जन्म झाला.
उद्योजक, राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा १९५७ मध्ये जन्म झाला. महाराष्ट्रात ते मंत्री असतांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती केली होती.
भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा १९६२ मध्ये जन्म झाला. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार व प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.
आज यांची पुण्यतिथी
नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे १९१० मध्ये निधन झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे १९३५ मध्ये निधन झाले.
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे १९६४ मध्ये निधन झाले. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे.
लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे १९९४ मध्ये निधन झाले. ते धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील आहेत.
हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचे २००८ मध्ये निधन झाले.