गुजरातमध्ये कोसळलेल्या 140 वर्ष जुना पूलाचा इतिहास नेमका काय?
गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून सुमारे 500 जण नदीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती . मोरबी इथल्या मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळला आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेत 132 जणांचा मृत्यू झाला आहे.काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे 500 लोक नदीत बुडाले आहेत. मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते.
140 वर्ष जुना पूलाचा इतिहास नेमका काय?
स्वातंत्र्यापूर्वी 1887 च्या सुमारास मोरबीचे तत्कालीन राजे वाघजी रावजी ठाकोर यांनी हा पूल बांधला होता. मच्छू नदीवरील हा पूल मोरबीच्या लोकांसाठी एक प्रमुख पर्यटन स्थळ होते. मोरबीच्या राज्यकर्त्यांच्या काळात बांधलेल्या या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तो बांधला गेला तेव्हा त्याच्या बांधकामात युरोपमध्ये अस्तित्वात असलेले सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले. राजकोट जिल्ह्यापासून 64 किमी अंतरावर मच्छू नदीवर बांधलेला हा पूल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. म्हणूनच अभियांत्रिकी कला आणि जुना पूल असल्याने तो गुजरात पर्यटनाचा विषय बनला होता. नवीन वर्षात हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. यापूर्वी हा पूल सात महिने बंद होता
या पुलाची एकूण लांबी 765 फूट असून रुंदी 4.5 फूट होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्याची वेळोवेळी दुरुस्ती केली जात होती. हा पूल दिवाळीला खुला होण्यापूर्वी सात महिने दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी या पुलावर पोहोचले आणि तेव्हाच ही दुर्घटना घडली. हा १.२५ मीटर रुंद पूल दरबार गड पॅलेस आणि लखधीरजी अभियांत्रिकी महाविद्यालयाला जोडतो. त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती आणि देखभालीसाठी १५ वर्षांकरीता ओरेव्हा ग्रुपला देण्यात आला होता. त्यांनी दुरुस्तीनंतर महानगपालिकेला माहिती न देताच पर्यटकांसाठी तो सुरू केला. ब्रिजचे सेफ्टी ऑडिटही झाले नसल्याचे मोरबी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पूल सुरू करम्यात आला होता. या पुलाच्या फिटनेसचं सर्टिफिकेट मात्र महापालिकेनं अद्याप दिलं नव्हतं असंही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. झूलता पूल १८८० मध्ये बांधण्यात आला होता. तो १५० पेक्षा जास्त लोकांचे वजन पेलू शकला नाही.