Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाची संपूर्ण विधी, जाणून घ्या अगदी सोपी पद्धत
हिंदू धर्मात विवाह इत्यादी शुभ कार्ये कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून सुरू होतात. या दिवशी तुळशीशी शालिग्रामचा विवाह करण्याची परंपरा आहे. जो भक्त तुळशीविवाहाचा विधी करतो, त्याला कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते. दुसरीकडे, एकादशीच्या व्रताबद्दल अशी श्रद्धा आहे की, वर्षातील सर्व 24 एकादशींचे व्रत केल्याने लोकांना मोक्ष मिळते.
तुळशी विवाहासाठी अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप लावले जाते. तुळशीच्या समोर चंदन, सिंदूर, सुहाग वस्तू, तांदूळ मेहंदी, मोली धागा, फुले, आणि मिठाई पूजेच्या साहित्य ठेवली जाते. तुळशीच्या शेजारी रांगोळी काढली जाते. या तुळशीविवाहासाठी काही वस्तू असणे आवश्यक असते. पहा यादी.
या गोष्टी पूजेत अवश्य असाव्या
एकादशीला पूजास्थळी मंडप उसाने सजवला जातो. भगवान विष्णूची मूर्ती खाली विराजमान करून भगवान विष्णूला मंत्रांनी जागृत करण्यासाठी पूजा केली जाते.
तुळशीला नवरीसारखे सजवा
प्रत्येकजण आवडी प्रमाणे आणि हौस म्हणून तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात.
गौरीप्रमाणे पूजा
तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरतात. तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार केले जातात.
तुलसी विवाह कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा माता तुळशीने भगवान विष्णूंना क्रोधाने शाप दिला की, तू काळा दगड होशील. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवाने शालिग्राम पाषाणाच्या रूपात अवतार घेतला आणि तुळशीशी विवाह केला. दुसरीकडे, तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. अनेकजण एकादशीला तुळशीविवाह करत असले तरी कुठेतरी तुळशीविवाह द्वादशीच्या दिवशी होतो. अशा परिस्थितीत तुळशी विवाहासाठी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींची वेळ निश्चित करण्यात आली आहे.