कॉमेडी शोपासून पंजाबचा सीए : भगवंत मान यांचा असा आहे प्रवास

कॉमेडी शोपासून पंजाबचा सीए : भगवंत मान यांचा असा आहे प्रवास

Published by :
Vikrant Shinde
Published on

पंजाब (Panjab) राज्यात आम आदमी पक्ष AAP मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकणार आहे. त्याचबरोबर भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी विधानसभेची जागाही जिंकली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे (Congress) दलबीर सिंग गोल्डी (Dalbir Singh Goldie) यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.


निकालाच्या दिवशी सकाळी भगवंत मान यांनी गुरुद्वारात जाऊन प्रार्थना केली होती. ते संगरूर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना (Gursagar Mastuana) येथे पोहोचले होते. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनीही गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली.
सर्व एक्झिट पोलमध्ये (Exit poll) असे सांगण्यात आले होते की, यावेळी आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सरकार स्थापन करू शकते. आपने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले होते. ते सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
भगवंत मान हे सध्या आम आदमी पार्टीचे खासदार आहेत. ते दुसरी वेळेस लोकसभेत पोहचले आहेत. ते संगरूर (Sangrur) मतदारसंघाचे खासदार आहेत. धुरी (Dhuri) विधानसभा मतदारसंघ याच भागात येतो. पंजाबच्या धुरी विधानसभेतून भगवंत मान 38,000 हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 रोजी भारतातील पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात झाला. त्याने पंजाबमधील संगरूर येथील एसयूएस (SUS) कॉलेजमधून बीकॉम BCOM केले आहे. वाणिज्य क्षेत्रात पदवी घेतली. भगवंत मानने कॉमेडीपासून ते राजकारणापर्यत सर्वत्र स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. भगवंत मान यांनी इंद्रप्रीत कौरशी (Indrapreet Kaur )लग्न केले होते.

भगवंत मान हे सुरुवात मनप्रीत सिंग बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीसोबत सोबत झाली होती. 2012 मध्ये त्यांनी लेहरा विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश मिळाला नाही. यानंतर भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये, भगवंत मान आम आदमी पक्षात सामील झाले आणि आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आपले नाव रिंगण केले. येथे त्यांनी 2 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे लभ सिंग कोण आहेत?
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना भादूर मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या लभ सिंग यांनी मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत केलं आहे. भादूर मतदार संघासोबत चमकूर साहीब मतदार संघातही चन्नी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लभ सिंग हे मोबाईल रिपेअरिंगचं दुकान चालवायचे. 2014 साली लभ सिंग यांनी विकत घेतलेली हिरो होंडाची एक बाईक हे एकमेव वाहन त्यांच्याकडे असून आपल्या निवडणुक प्रतिज्ञापत्रातही त्यांनी याचा उल्लेख केला आहे. प्रचारासाठी लभ सिंग यांनी यासाठी एक वेगळा मार्ग स्वीकारला होता. ते बस स्टँडवर जाऊन स्थानिक लोकांशी बोलून आपला प्रचार करायचे तर कधी स्वतः त्यांच्यासोबत बसमध्ये प्रवास करुन आपला प्रचार करायचे. निवडणुक आयोगाने कोरोनामुळे यंदा प्रचारावर निर्बंध घातले होते. याचा आपल्याला फायदाच झाल्याचं लभ सिंग म्हणाले.

अण्णांच्या आंदोलनामुळे आप प्रवेश
अण्णा हजारेंच्या आंदोलनाने प्रेरित होऊन लभ सिंग यांनी 2013 साली आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. लभ सिंग यांची आई ही सरकारी शाळेत सफाई कर्मचाऱ्याचं काम करते तर त्यांचे वडील हे चालक आहेत. 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर लभ सिंग यांनी मोबाईल दुरुस्तीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आपल्या गावात दुकान सुरु केलं. परंतू गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी हे दुकान बंद ठेवलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com