World No-Tobacco Day
World No-Tobacco Day Team Lokshahi

ही आहे 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' 2022 ची थीम...

तंबाखूच्या (tobacco) सेवनाने जगभरात दरवर्षी 80 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.
Published by :
Team Lokshahi
Published on

31 मे हा 'जागतिक तंबाखू दिन' म्हणून साजरा केला जातो. जागतिक (world) आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी 1987 मध्ये तंबाखूच्या साथीच्या आणि त्यामुळे होणारे टाळता येण्याजोग्या मृत्यू आणि रोगाकडे (disease) लक्ष वेधण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी जागतिक तंबाखू दिनाची थीम 'पर्यावरणाचे रक्षण करा' अशी आहे.

World No-Tobacco Day
Live Update : TET घोटाळा प्रकरण, शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे यांना जामीन मंजूर

तंबाखूच्या सेवनाने जगभरात दरवर्षी 80 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूचे सेवन सध्याच्या वेगाने सुरू राहिल्यास, 2030 पर्यंत हा आकडा लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे. भारत हा जगातील तंबाखूचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या भारतातील रुग्णांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण जवळपास 80% आहे.

World No-Tobacco Day
रायगड हादरलं! आईनं आपल्या 6 मुलांसह घेतली विहरीत उडी

भारतात, फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्व कर्करोगांपैकी 5.9% आणि सर्व कर्करोगाशी संबंधित मृत्यूंपैकी 8.1% आहे. जागतिक तंबाखूजन्य संकट, मृत्यू, आणि रोगांच्या पार्श्वभूमीवर, जागतिक संघटनेच्या (WHO) सदस्य देशांनी 31 मे 1987 रोजी 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' पाळण्याचे मान्य केले. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com