Swami Vivekananda Jayanti Marathi Bhashan: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या मुद्दे

Swami Vivekananda Jayanti Marathi Bhashan: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या मुद्दे

भारतात दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात येतो.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारतात दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस होय. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना योग्य दिशा देतील यासाठीच त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर करण्यात आला. यासाठी आपण आज मराठी भाषण पाहणार आहोत.

मराठी भाषण

आज स्वामी विवेकानंद यांची जयंती. यानिमित्ताने मी तुमच्यापुढे माझे दोन शब्द मांडत आहे, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे, हीच माझी इच्छा. स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी या दिवशी असते. कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमुळे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. भारत तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील. ते अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला.

1985 पासून देशभरात दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन जगभरात ओळखली जाते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत. 1902 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

छोटेखानी मराठी भाषण निबंध

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. नरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांच्याविषयी अभ्यास केला. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरू श्रीराम कृष्ण परमहंस यांच्याकडून अध्यात्मिक शिक्षण घेतले.

त्यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत. स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन जगभरात ओळखली जाते. 1984 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1985 पासून देशभरात दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. 1902 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com