Shravan Somvar : Special Story : श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) जिल्ह्यामधील हे ज्योतिर्लिंग व स्वयंभू असून, रुद्रसागर तलावाच्या काठावर आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे येतात. श्री महांकालेश्वर ज्योतिर्लिंगची (Mahakaleshwar Jyotirlinga) प्रतिमा दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंगात फक्त महांकालेश्वर येथेच भस्म आरती होते.
महाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते. कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे. परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते.
येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिन दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिर चे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात.
महाकालेश्वर मंदिर एका विशाल बागीच्याच्या मध्यभागी आहे. हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे. शिव पुराणानुसार एकदा त्रिदेव ब्रम्हा,विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकराच्या मनात ब्रम्हदेव आणि महादेव यांची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे. हे शोधन्यास सांगितले.
ब्रम्हा व विष्णू दोघांसाठी शिवांनी एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होतो दिसेना. दोघेही त्या स्तंभाचे टोक शोधू लागले. पण तो सापडे ना श्रीविष्णू थकले व आपली हर मान्य केली तर ब्रम्हा खोट बोलले कि त्यांना त्याचे टोक सापडले.
यावरून क्रोधीत होवून शिवांनी त्यांना श्राप दिला कि लोक तुमची पूजा कधीच करणार नाही तर विष्णूचि सर्वच पूजा करतील. तेव्हा क्षमा मागत ब्रम्हानी शिवाची विनवणी केली तेव्हा या स्तंभात शिव स्वतः विराजमान झाले.
हे स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मानले जाते. स्तंभाचे रुपांतर लिंगात झाले तेव्हा पासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख १२ ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर सर्वात पवित्र मानले जाते.
कसे पोहचाल
उज्जैनचे सर्वात जवळचे विमानतळ इंदूर विमानतळ आहे जे शहरापासून 55 किमी दूर आहे. इंदूर उड्डाणांद्वारे भारतातील सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे, त्यामुळे पर्यटक कोणत्याही मोठ्या शहरातून इंदूरला उड्डाण घेऊ शकतात आणि विमानतळावर उतरल्यानंतर तुम्ही बस, टॅक्सी किंवा कॅब बुक करू शकता आणि उज्जैनला येऊ शकता.
राज्य रस्ते वाहतूक सार्वजनिक बस सेवांद्वारे उज्जैन चांगले जोडलेले आहे. एमपीच्या प्रमुख शहरांपासून उज्जैनपर्यंत नियमित बस सेवा उपलब्ध आहे. या मार्गांवर सुपर फास्ट आणि डिलक्स ए/सी बसेस देखील उपलब्ध आहेत.
उज्जैन जंक्शन रेल्वे स्टेशन हे स्वतःच एक प्रमुख रेल्वे स्टेशन आहे जे देशातील सर्व प्रमुख स्थानकांशी चांगले जोडलेले आहे. म्हणूनच पर्यटक भारतातील कोणत्याही मोठ्या शहरापासून उज्जैन जंक्शनपर्यंत ट्रेन घेऊ शकतात.