Mangala Gauri 2024: श्रावण मासातील मंगळागौरी व्रताचे महत्त्व आणि पूजाविधी

Mangala Gauri 2024: श्रावण मासातील मंगळागौरी व्रताचे महत्त्व आणि पूजाविधी

मंगळागौरी व्रत श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केले जाते. हे व्रत विवाह झालेल्या स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मंगळागौरी व्रत श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केले जाते. हे व्रत विवाह झालेल्या स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात. विवाहाच्या पहिली पाच वर्षे हे व्रत करावे. यासाठी अशाच अर्थात लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या किमान पाच नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते. नंतर रात्री जागरण करतात.

सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सोवळं नेसावे. सोवळं नेसून ही पूजा केली जाते. सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपतीची पूजा करावी. त्यानंतर लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करून त्याशेजारी शिवपिंड ठेवावी. नंतर त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी. मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगळागौरीचं आवाहन करावं.

देवीला विविध झाडांची पाने, फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा. 16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्या करता देवीला 3 अर्घ्य द्यावीत. मंगळागौरीसाठी महिलांना आमत्रंण द्यावे. त्यांना भोजन, हळदी-कुंकू द्यावे. संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावे. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत, गाणी गात मंगळागौर जागवतात.

श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळागौरी पूजनाला सुरुवात झाली आहे. अस म्हणतात की, पती-पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. तिचं पूजन केलं जातं. महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग ५ वर्षे मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. मंगळागौरीला महिला एकत्र येत नवविवाहितेचं गोडकौतुक करण्यासाठी विविध खेळ, गाणी, फुगडी घालू आनंद साजरा करतात. त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो.

Mangala Gauri 2024: श्रावण मासातील मंगळागौरी व्रताचे महत्त्व आणि पूजाविधी
Shravan Somvar 2024: पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? जाणून घ्या...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com