Shravan Month 2022:  शंकराची पूजा कशी करावी?
Team Lokshahi

Shravan Month 2022: शंकराची पूजा कशी करावी?

श्रावण (Shravan) महिन्याला सुरुवात होत आहे. पावसाळ्यात येणाऱ्या या श्रावणाचे धार्मिकदृष्ट्या अनोखे महत्व आहे.
Published by :
shweta walge
Published on

श्रावण (Shravan) महिन्याला सुरुवात होत आहे. पावसाळ्यात येणाऱ्या या श्रावणाचे धार्मिकदृष्ट्या अनोखे महत्व आहे. मराठी श्रावण महिना म्हटलं की, सर्व सणांचा राजा मानला जातो. या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवर भ्रमण करतात. या महिन्यात महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळते. श्रावणातील सोमवारचे विशेष महत्व असते. या महिन्यात सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते.

श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. मात्र, जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी.

श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करावी –

श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी.

एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी, त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा.

त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, दिवा लावावा.

पूजा करत असताना “ॐ महाशिवाय सोमाय नम:” किंवा “ॐ नम: शिवाय” या मंत्राचा जप करावा.

धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा-नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने । शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।

तसेच, शिवामूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा”, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.

त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करावी.

दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com