mahashivratri घर बसल्या घ्या, 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन

mahashivratri घर बसल्या घ्या, 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन

Published by :
Jitendra Zavar
Published on
सोमनाथ
सोमनाथ

१)सोमनाथ ज्योतिर्लिंग
देशातील पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ हे सौराष्ट्र, गुजरात येथे आहे. हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. असे मानले जाते की सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना स्वतः चंद्रदेवांनी केली होती.

मल्लिकार्जुन
मल्लिकार्जुन

२)मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर वसलेले आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला दक्षिणेचे कैलास असेही म्हणतात.

महाकालेश्वर
महाकालेश्वर

3)महाकालेश्वर ज्योतिर्लिंग
महाकालेश्वर हे तिसरे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आहे. क्षिप्रा नदीच्या काठी ते वसलेले आहे. दक्षिणाभिमुख असलेले हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची भस्मरी जगभर प्रसिद्ध आहे.

ओंकारेश्वर
ओंकारेश्वर

4)ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशात आहे. हे मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर डोंगरावर वसलेले आहे.

5)केदारनाथ ज्योतिर्लिंग

केदारनाथ
केदारनाथ

देवभूमी उत्तराखंडमध्येहे ज्योतिर्लिंग आहे. अलखनंदा आणि मंदाकिनी नावाच्या दोन नद्यांच्या काठी केदारच्या शिखरावर बांधले आहे. असे मानले जाते की जो भक्त भगवान केदारनाथचे दर्शन घेतल्याशिवाय जो बद्रीनाथला जातो, त्याची यात्रा अपूर्ण मानली जाते.

भीमाशंकर
भीमाशंकर

6) भीमाशंकर ज्योतिर्लिंग
भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे शहरापासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगात असलेले शिवलिंग खूप जाड आहे, म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात.

काशी विश्वनाथ
काशी विश्वनाथ

7) विश्वनाथ ज्योतिर्लिंग
विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात आहे. वाराणसीला काशी असेही म्हणतात. विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे गंगा नदीच्या काठी वसलेले आहे. शिवशंभूंनी कैलास सोडले आणि येथे आपले कायमचे वास्तव्य केले, असे सांगितले जाते.

त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर

8)त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
महाराष्ट्रातील नाशिकपासून ३० किमी पश्चिमेला असलेले त्र्यंबकेश्वरला आहे. हे ज्योतिर्लिंग हे गोदावरी नदीच्या काठी काळ्या दगडांनी बांधलेले आहे.

वैजनाथ
वैजनाथ

9)वैजनाथ ज्योतिर्लिंग
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे.

नागेश्नवर
नागेश्नवर

10)नागेश्वर ज्योतिर्लिंग
नागेश्वर ज्योतिर्लिंगही गुजरातमध्ये आहे. हे गुजरातमधील बडोदा शहरातील गोमती द्वारकाजवळ आहे. असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाचे नाव स्वतः भगवान शंकराच्या इच्छेनुसार ठेवण्यात आले होते.

11)रामेश्वर ज्योतिर्लिंग
देशातील 11 वे ज्योतिर्लिंग तामिळनाडूच्या रामेश्वर येथे आहे ज्याला रामनाथम म्हणतात. जाणकारांच्या मते, रावणाच्या लंकेत जाण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी ज्या शिवलिंगाची स्थापना केली होती, ते रामेश्वर या नावाने जगभर ओळखले जाते.

घुष्मेश्वर
घुष्मेश्वर

12)घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
देशातील १२ वे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आहे. हे महाराष्ट्रातील औरंगाबादजवळ दौलताबाद जवळ आहे. त्याला घुष्मेश्वर असेही म्हणतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com