Shravan Somvar 2024: दुसरा श्रावणी सोमवार, महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? जाणून घ्या...

Shravan Somvar 2024: दुसरा श्रावणी सोमवार, महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? जाणून घ्या...

श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्य असतात. यंदा श्रावणात 5 सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्य असतात. यंदा श्रावणात 5 सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामूठ महादेवाला अर्पण केली जाते. 12 ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी हे जाणून घेऊया.

भगवान महादेवांनी कामासूरावर विजय मिळवला होता, तसे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो, असे म्हटले जाते.

आज 12 ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहिली जाते, त्याचप्रमाणे शंकराला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते. श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com