साई बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त 'हे' खास मेसेज शेअर करून करा अभिवादन
Sai Baba Punyatithi 2023 : ‘सबका मलिक एक है’ हे वाक्य कानावर पडल्यास डोळ्यासमोर ते म्हणजे शिर्डीचे साईबाबा. गेले कित्येक वर्षे साईबाबा हे देशातीलच नाही तर जगातील भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. दरवर्षी साई बाबांची पुण्यतिथी विजयादशमी अर्थात दसऱ्याला साजरी केली जाते. या दिवसाला शिर्डी साई बाबा महासमाधी दिवस म्हणून ओळखले जाते. तिथीनुसार ही पुण्यतिथी साजरी केली जाते. या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही साईबाबा पुण्यतिथीचे मेसेजेस, व्हॉटस् अॅप स्टेटस, फेसबुकला शेअर करु शकता.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगिराज
साक्षात् परब्रह्म
श्री सच्चिदानंद
सदगुरु साईनाथ
महाराज की जय..!
!! ॐ साई राम !!
माझ्या सहवासात राहा आणि शांत राहा, मी सर्व काही ठीक करणार
साईबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
साई अविनाश पुरातन| नाही हिंदू ना यवन|
जात पात कुळ गोतहीन| स्वरुप जाण निजबोध||
साईबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
जे असा विचार करतात की मी फक्त शिर्डीत आहे त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेलेच नाही
साईबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
शिर्डीस ज्याचे लागतील पाय| टळती अपाय सर्व त्याचे|
साईबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन