Plastic Pollution
Plastic PollutionLokshahi Team

Plastic Pollution : प्लास्टिक प्रदूषणावर शास्त्रज्ञांनी शोधला उपाय

प्लास्टिकवर उपाय म्हणून एन्झाईमचा शोध घेण्यात आला आहे.
Published by :
Published on

पर्यावरणातील प्लास्टिक प्रदूषण दूर करण्यासाठी अमेरिकन शास्त्रज्ञांनी उपाय शोधला आहे. अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शोधलेले एन्झाइम एका आठवड्यात प्लास्टिकचा कचरा मातीत मिसळू शकतो. हे एन्झाइम हे प्लास्टिकचे विघटन करू शकते. प्लास्टिक जमिनीत येण्यासाठी 20 ते 500 वर्षे लागतात.

Plastic Pollution
वेळेवर झोप लागत नाही ? जाणून घ्या उपाय

जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी हे एन्झाइम तयार करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला. एन्झाइम हा एक प्रकारचा प्रथिन आहे जो जैविक प्रक्रियेला गती देणारा पदार्थ आहे. संशोधकांच्या मते हे एन्झाइम पॉलिथिन टेरेफ्थालेट (पीईटी) नावाचे प्लास्टिक डी-कंपोझ करण्यासाठी खास तयार केले गेले आहे.

पृथ्वीतलावर 12% कचरा हा ढिगाऱ्यांमध्ये फेकलेला प्लास्टिकच आहे. ज्यामध्ये पाण्याच्या बाटल्या आणि इतर काही प्लास्टिकचा समावेश आहे. यावर उपाय म्हणून एन्झाईम याचा शोध घेण्यात आला आहे. नवीन एन्झाइम केवळ काही दिवसांमधेच हे प्लास्टिक विघटित करणार नव्हे तर या प्रक्रियेपूर्वी प्लास्टिक देखील बनवता येईल. यास 'व्हर्जिन प्लास्टिक' असे नाव देण्यात आले आहे असं संशोधन लेखक प्रोफेसर हॅल अल्पर यांनी सांगितले. म्हणजेच मातीत सापडलेले प्लास्टिक पुन्हा मूळ स्वरूपात आणता येते. 2005 पासून प्लॅस्टिकचे वेगाने विघटन करण्यासाठी 19 एंजाइम विकसित केले गेले आहेत. परंतु नवीन एन्झाइम अद्वितीय आहे. हे वेगवेगळ्या तापमान आणि परिस्थितींमध्ये समान कार्य देखील करू शकते. सर्व एन्झाईम्स वातावरणात असलेल्या जीवाणूंमधून काढले जातात जे प्लास्टिकमध्येच आढळतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com