एप्रिल फुल डे का साजरा करतात माहित आहे का?
आपल्याकडे वापरले जाणारे कॅलेंडर हे इंग्रजी आहे. त्यानुसार वर्षाचे बारा महिने असतात. एप्रिल महिन्यामध्ये सर्वांना एकमेकांना एप्रिल फूल बनवायला आवडते. प्रत्येक जण एक एप्रिल ची वाट पाहत असतो, व त्या दिवशी आपल्या मित्राला, आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींना एप्रिल फुल कसे बनवता येईल याची नवनवीन कल्पना शोधत असतो. परंतु ही एप्रिल फूल बनवण्याची पद्धत कधी सुरू झाली, कुठे सुरू झाली याची माहिती आहे का? नसेल तर आपण जाणून घेऊयात.
फ्रान्सने (France) पंधराशे (1563) मध्ये ज्युलियन कॅलेंडर(Julian Calendar) सोडून अधिक योग्य असे ग्रेगोरियन कॅलेंडर (Gregorian Calendar) वापरणे सुरू केले. ज्युलियन कॅलेंडर नुसार नवीन वर्ष एक एप्रिलला सुरू व्हायचे. पण ते आता एक जानेवारी पासून होतंय, ही बातमी अनेकांपर्यंत उशीरा पोहोचल्यामुळे अशा लोकांना एप्रिल फुल म्हणायची पद्धत सुरू झाली.