लोकशाही स्पेशल
Raksha Bandhan 2024: हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिण- भावाला द्या "या" प्रेमळ शुभेच्छा
रक्षणाबंधन हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. एका बहिणीला तिच्या भावाकडून हवी असणारी लाख मोलाची भेट म्हणजे भावाने तिची घेतलेली काळजी.
सोबत वाढले सोबत खेळले
प्रेमात न्हाले बालमन,
याच प्रेमाची आठवण म्हणून
आला हा रक्षाबंधनाचा सण...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे,
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो
तरी त्यात जिव्हाळा आहे,
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण–भावाचा पवित्र सण...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखित सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अनोखं आहे, पण निराळ ही आहे
तक्रारही आहे आणि प्रेमही आहे,
लहानपणीच्या आठवणींचा पेटाराच आहे
आपल्या भावा बहिणीचं हे नातं गोड आहे...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!