Rajmata Jijau Jayanti Marathi Bhashan: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या मुद्दे
12 जानेवारी 1598 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ देऊळगाव या ठिकाणी झाला. 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. त्यांच्या जयंतीनिमित्त भाषणाचे काही मुद्दे जाणून घेऊया
मराठी भाषण
आज राजमाता जिजाऊ यांची जयंती. यानिमित्ताने मी तुमच्यापुढे माझे दोन शब्द मांडत आहे, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे, हीच माझी इच्छा. राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ साली झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते.
राजमाता जिजाऊ यांची जयंती महाराष्ट्रात थाटामाटात साजरी केली जाते. जिजाऊंना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे चार भाऊ होते. राजमाता जिजाऊ यांचा विवाह पुण्याच्या शहाजीराजे यांच्याशी झाला होता. जिजाऊंना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. जिजाऊंनी शिवबांना लहानपणीपासून रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्ध कला शिकले.
गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही राजमाता जिजाऊंची इच्छा होती. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली. ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले. माँसाहेबांचा उल्लेख करताना आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही. माँसाहेब राजमाता जिजाऊंना माझे शतशः नमन
“मुजरा माझा माता जिजाऊंना,
जिने घडविले शुर शिवबाला.
साक्षात होती ती आई भवानी,
जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!”
जिजाऊ जयंती निबंध भाषण
नमस्कार मित्रांनो राजमाता जिजाऊ यांची जयंती. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण निबंध याच्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ साली झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते.
लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले.शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. त्यामुळे, जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले.
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण आणि महाभारातचे संस्कार रुजवले. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली. ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले. माँसाहेब राजमाता जिजाऊंना माझे शतशः नमन.