पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या मुद्दे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या मुद्दे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील, माळव्याच्या 'तत्त्वज्ञानी महाराणी' म्हणून ओळखल्या जातात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील, माळव्याच्या 'तत्त्वज्ञानी महाराणी' म्हणून ओळखल्या जातात. भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भय राणी होत्या. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्या बाई होळकर यांचे निधन झाले होते. इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले.

मराठी भाषण निबंध

आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी. यानिमित्ताने मी तुमच्यापुढे माझे दोन शब्द मांडत आहे, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे, हीच माझी इच्छा. मराठ्याच्या इतिहासामध्ये अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले पण त्यामधील अहिल्याबाई होळकर यांचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना 'पुण्यश्लोक' असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. अहिल्याबाई होळकर महाराष्ट्रामध्ये मंदिर उभारणी मंदिरांचा जिर्णोद्धार यासाठी खूप मोलाचे कार्य केले त्याचबरोबर एक उत्तम प्रशासक म्हणून देखील त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. अहिल्याबाई होळकर यांचा अगदी लहानपणीच मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी विवाह झाला. वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर हे अगदी बिनधास्त जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व होते. साहजिकच बऱ्याचशा जबाबदाऱ्या अहिल्याबाई होळकर आणि त्यांचे सासरे यांना पार पाडाव्या लागल्या. इसवी सन 1754 साली झालेल्या कुंभेरच्या लढाईत पती खंडेराव होळकर मारले गेल्यानंतर त्या कालच्या प्रथेप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांना सती जाणे भाग होते. परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांना सती जाण्यापासून अटकाव केला. आज आपण ज्या समान नागरी कायद्याच्या वल्गना करतो, परंतु अहिल्याबाई होळकर यांनी आपला राज्यकारभार करीत असताना सर्वांसाठी समान कायदा ही भूमिका अगदी त्या काळापासूनच घेतलेले आपल्याला दिसते. शेवटी मी एवढेच म्हणेन

असंख्य राण्या या जगतात होऊन गेल्या

परंतु पुण्यश्लोक अहिल्याबाई

यासारखी राणी होणे नाही

आजही गर्व जिचा आहे

मराठी माणसाला

आज अभिवादन करतो

त्यांना त्यांच्या पुण्यतिथीला.

छोटेखानी मराठी भाषण निबंध

महाराष्ट्रामध्ये अनेक वीरांगणा देखील होऊन गेल्या त्यामधीलच एक विरांगणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होय. आज 13 ऑगस्ट अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी.अहिल्याबाई होळकर यांचा अगदी लहानपणीच मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी विवाह झाला. वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर हे अगदी बिनधास्त जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व होते. साहजिकच बऱ्याचशा जबाबदाऱ्या अहिल्याबाई होळकर आणि त्यांचे सासरे यांना पार पाडाव्या लागल्या. सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर आपल्या राज्यामध्ये चालणारी अनागोंदी, चोऱ्या, दरोडे यांना अटकाव करण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी केले जातीने या कामात लक्ष घातले. आज आपण ज्या समान नागरी कायद्याच्या वल्गना करतो, परंतु अहिल्याबाई होळकर यांनी आपला राज्यकारभार करीत असताना सर्वांसाठी समान कायदा ही भूमिका अगदी त्या काळापासूनच घेतलेले आपल्याला दिसते.

होळकरांची सुन होती बहुगुणी !

शिक्षणाची ओढ होती लहानपणी !!

गरज ओळखूनी सुखावले सर्व जनी !

अशी जाहली दूरदृष्टी एक मर्दानी !!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com